महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मुंबई ची पाहणी करताना मा. शालेय शिक्षण मंत्री
मा. ना. दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष नियामक मंडळ , महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मुंबई ची पाहणी करताना.
७३ वा वर्धापन दिन सोहळा
मा. राज्यमंत्री शालेय शिक्षण क्रीडा विभाग डॉ. श्री. पंकजजी भोयर यांच्या उपस्थितीत साजरा
पोवाडा व इतर लोककला प्रशिक्षण शिबिर
राज्य बालनाट्य स्पर्धा
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनाय वतीने आयोजित राज्य बालनाट्य स्पर्धा मध्ये दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी साहित्य संघ मंदिर गिरगाव मुंबई या नाट्यगृहात बाल भवन तर्फे जय हो फॅन्टसी हे नाटक सादर झाले या नाटकात निषाद दांडेकर, क्रितिका गुप्ता यांना अभिनयाचे पारितोषिक तर सृजनी यमनूरवार यांना रंगभूषेचे द्वितीय पारितोषिक मिळाले.
बाल नाटिका स्पर्धा
शास्त्रीय नृत्य स्पर्धा
गरबा दांडिया प्रशिक्षण वर्ग
नवरात्र उत्सवानिमित्त गरबा दांडिया प्रशिक्षण वर्ग
महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन तर्फे दिनांक ५ ते ९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत इयत्ता ३ री ते १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता अभिनय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.
शालेय वक्तृत्व स्पर्धा
महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन मुंबई आयोजित लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त शालेय वक्तृत्व स्पर्धा इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वी या दोन गटात संपन्न झाली
बालदीन सोहळा २०२४
बाल दिन सोहळा निमित्त १४ नोव्हेंबर रोजी वर्ग केजी ते इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांना करिता वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली.
बालदीन सोहळा २०२४
बाल दिन सोहळा निमित्त १३ नोव्हेंबर रोजी इयत्ता ५ वी ते ते १० वीच्या विद्यार्थ्यांना करिता अभंग गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली.
बालदीन सोहळा २०२४
बाल दिन सोहळा निमित्त १३ नोव्हेंबर रोजी इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना करिता शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली.
बालदीन सोहळा २०२४
बाल दिन सोहळा निमित्त १४ नोव्हेंबर रोजी इयत्ता ३ री ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना करिता बालगीत/बडबडगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली.
बालदीन सोहळा २०२४
बाल दिन सोहळा निमित्त १४ नोव्हेंबर रोजी इयत्ता ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० च्या विद्यार्थ्यांना करिता चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली.
अभिनय स्पर्धा
महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन मुंबई आयोजित अभिनय स्पर्धा इ. १ ली ते ४ थी, इ. ५ वी ते ७ वी आणि इ. ८ वी ते १० वी या तीन गटात आयोजित करण्यात आली.
निबंध लेखन व काव्य लेखन स्पर्धा
बाल दिन सोहळा निमित्त १६ नोव्हेंबर रोजी इयत्ता ५ वी ते ७ वी इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना करिता निबंध लेखन व काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन तर्फे दिनांक ११ ते १३ जुलै आणि १८ ते २० जुलै २०२४ या कालावधीत इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता गायन – अभिनय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन तर्फे दिनांक ५ , ६ व १३ जुलै २०२४ या कालावधीत इयत्ता ५ ते १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता छत्री रंगविणे कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
गणेश मूर्ती कृतिसत्र आणि सजावट कार्यशाळा २०२४
गणेशोत्सवापूर्वी गणेश मूर्ती साकारण्याचा आनंद बालकांना स्वनिर्मितीतून मिळवून देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई येथे इयत्ता ६ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांकरिता दिनांक २९ ऑगस्ट आणि ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत दुपारी १२:०० ते दुपारी ०४: ०० या वेळेत गणेश मूर्ती कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावर्षी प्रथमच बालकांनी तयार केलेल्या गणेश मूर्ती करिता आवडीप्रमाणे सजावट करता यावी याकरिता दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपार १२:०० ते २ :०० आणि ३:०० ते ६:०० या वेळेत सजावट कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण स्नेही शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याबाबत बालकांना मार्गदर्शन करण्याकरिता आणि घरातील नेहमीच्या वस्तूपासून आकर्षक सजावट कशी करावी. याबाबत तज्ञ मार्गदर्शकांना आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी यांत आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवून उपक्रमाचा मनमुराद आंनद घेतला. आपल्याला हवी तशी मूर्ती साकारताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आयोजकांनाही सुखावणारा होता.
दिवाळी कृती सत्र २०२४
दिवाळी उत्सवापूर्वी बालकांना स्वनिर्मितीतून दिवाळी उत्सवाचा आनंद मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन मुंबई तर्फे इयत्ता ५ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांकरीता दिनांक २६ व २७ ऑक्टोबर २०२४ या रोजी दिवाळी कृतिसत्राचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शुभेछा कार्ड तयार करणे, शाडूच्या मातीपासून पणत्या तयार करणे आणि आकाशकंदील तयार करणे या विषयांचा समावेश कृतिसत्रात करण्यात आला होता. या विषयांचे मार्गदर्शन बालकांना करण्याकरिता बोलवण्यात आले होते. सदर कृतिसत्र हे नि:शुल्क आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक शाळेतील १० विद्यार्थ्यांना कृतिसत्रात बोलवण्यात आले होते. शुभेच्छा कार्ड व आकाशकंदील तसेंच पणत्या बनवण्याकरिता सर्व आवश्यक साहित्य बालभवन कडून देण्यात आले होते.
नाट्य प्रशिक्षण शिबिर
गायन कार्यशाळा
किल्ला बनविणे स्पर्धा
लाठीकाठी वर्ग
मल्लखांब
अभंग गायन स्पर्धा
गायन कार्यशाळा
राष्ट्रीय बाल भवन दिल्ली
राष्ट्रीय बाल भवन दिल्ली आयोजित
राष्ट्रीय पर्यावरण शिबिर ,
स्कीट स्पर्धेत प्रथम पारितोषिक